अकोला(प्रतिनिधी)- अकोला महानगरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली तसेच नुकतेच घडलेल्या विदर्भातील वर्धा जिल्हयातील घटना ज्यामध्ये एका शिक्षक तरुनिला पेट्रोल टाकून जाळण्यात आले त्या घटनेचा निषेध व पीडित अंकिता ताई हिला सुद्धा श्रद्धांजली देण्यात आली व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी भगिनी यांच्या कडून शपथ घेण्यात आली की आम्ही हा दिवस आमच्या सीमेवर लढणाऱ्या शहीद जवान यांचा स्मरण दिवस म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू अशी शपथ घेण्यात आली त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला महानगर संघटन मंत्री शक्ती केराम यांनी सांगितले की 14 फेब्रुवारी हा दिवस आपण भारतीयांन साठी प्रेमाचा दिवस म्हणून नाही तर काळा दिवस आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे प्रतिपादन त्यांनि केले.
महानगर सोसिएल मिडिया प्रमुख आदित्य केंदळे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रामेश्वर जी भिसे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या .
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8