• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

Media Desk by Media Desk
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१३(जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून येत्या शुक्रवार दि. २१ पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या गावपातळीवर पहावयास उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले तपशिल पडताळून पहावयाचे आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार रथास आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. जिल्ह्यात या प्रचार रथा सोबतच सोशल मिडीया, आकाशवाणी अशा माध्यमांचा वापर करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

आज सकाळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी त्यांचे समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक गजानन पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हाधिकारी पापळकर आज (दि.१४) आकाशवाणीवर

या संदर्भात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत सविस्तर माहिती देणारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांची मुलाखत आकाशवाणी अकोला केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि.१४ रोजी सायं. साडेसात वाजता किसानवाणी या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख विजय दळवी यांनी या मुलाखतीचे संचलन केले आहे. ही मुलाखत आकाशवाणी अकोला केंद्राच्या एफ एम बॅंड १०२.४ मेगाहर्ट्ज वर ऐकता येईल. तसेच आकाशवाणीच्या newsonair या ॲपवरही ऐकता येईल असे विजय दळवी यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी ही मुलाखत ऐकून माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

Previous Post

गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर

Next Post

अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन रस्ता देखभाल दुरुस्ती आठवड्याभरात, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री ना.कडू यांना लेखी उत्तर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन रस्ता देखभाल दुरुस्ती आठवड्याभरात, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री ना.कडू यांना लेखी उत्तर

अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन रस्ता देखभाल दुरुस्ती आठवड्याभरात, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री ना.कडू यांना लेखी उत्तर

अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आयोजित क्रिकेट सामन्यात तेल्हारा संघाने मारली बाजी

अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आयोजित क्रिकेट सामन्यात तेल्हारा संघाने मारली बाजी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.