वाडेगांव दि .१० ( डॉ. शेख चांद)- वाडेगांव ते अकोला रस्त्याची दुरावस्था खुपच खराब झाली असून हा रस्ता कधीही भक्ष घेऊ शकतो. कारण वाडेगांव येथील निगृना नदीच्या पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजुला तसेच संपुर्ण रस्त्याने मोठ मोठे खड्डे झाले असून यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जनुकाय अपघात होण्याची वाट संबंधीत कर्मचारी, संबंधीत विभाग, पदाधीकारी, पहात असल्याची चर्चा नागरीकान मध्ये असून या रस्त्याने ये जा करणारे प्रवाशी, विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी, शेतकरी, वाहन धारक, मोटार सायकल ने प्रवास करणाऱ्या कित्येक नागरीकांना पाठीचा, मानेचा त्रास होत आहे, पाठीच्या मनक्या मध्ये गॅप पडत आहे, तसेच वाहनांचे ही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
नवीन वाहन या अकोला वाडेगांव रस्त्यामुळे भंगार होत आहेत. तरी ही संबंधीत विभाग या कडे लक्ष देत नाही. अशी चर्चा आहे. या खडडयांसाठी मगे रास्ता रोकोही झाला होतो. संबंधीत विभाग या कडे लक्ष देत नसून आता सर्व नागरीकांची माननीय मंत्री महोदय मा. खासदार संजयभाऊ धोत्रे साहेब, पालकमंत्री मा. ना. बचु भाऊ कडू साहेब, आमदार नितीन बापु देशमुख साहेब, तसेच सर्व लोकप्रतीनीधींनी या सर्वांनी या कडे लक्ष देऊन रस्त्याच्या दुरूस्ती साठी संबंधीत विभागाची झोप मोडावी असी सर्व नागरीकांची सर्व लोकप्रती नीधींना विनंती आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM