तेल्हारा(प्रतिनिधी)- अॅबॅकस स्किल क्रिएटिव्ह प्राव्हेट लिमिटेडच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत युनिक अॅबॅकस कलासच्या विद्यार्थ्यांनि घवघवीत यश मिळवले असून राज्यपातळीवर आपले नाव चमकवले आहे.
राज्यातील दहा अॅबॅकस फ्रांचाईसी कडून ४५० विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये तेल्हारा येथील युनिक अॅबॅकस कलासच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून कलासच्या १८ विद्यार्थ्यांनपैकी दोन विद्यार्थ्यांनी चॅम्पियन अवॉर्ड मिळवला यामध्ये निशा विनोद ठाकरे व निधी सुधीर इंगळे बाजी मारली तर ७ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला यामधे शरयु चतारे, अंशील मोहके, स्वरूप सोनोने, गौरी चतारे, ओम डोंगरे, साक्षी खडसे, जीवन जुबडे, यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक तनिष्का भालेराव, चिन्मय उंबरकार, निधी तायडे, श्रीहरी डोंगरे, अर्पित इंगळे, आनंदी उंबरकार, किरण खडसे, तनिष्का गडम, प्रांजल खुमकर यांनी पटकावला यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय युनिक अॅबॅकस कलासच्या संचालिका आरती खोट्टे (अहिर) यांना दिले. बक्षीस वितरण शेगावच्या नगराध्यक्षा शकुंतला बुच, ऍड भटकर, स्किल अॅबॅकस चे संचालक सुपे, व्यवस्थापकीय संचालक छाया कंकाळ यांच्या हस्ते देण्यात आले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM