अकोला, दि. 7 (जिमाका): महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1 लक्ष 13 हजार 469 कर्ज मुक्ती साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी 1 लक्ष 6 हजार 527 शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी अपलोड केले आहेत. उर्वरित कर्जमुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांची अर्ज त्वरित अपलोड करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कर्जमुक्ती योजने संदर्भात बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांनी 37 हजार 247, जिल्हा मध्यवती सहकारी बँकांनी 57 हजार 207 व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 12 हजार 73 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत. याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून पुढील 3 दिवसात कर्ज मुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
इस चैनल पर कोई खबर देनी हो तो कैसे पहुचाये यह प्लीज बताये.. धन्यवाद.. रमेश तोरावत जैन अकोला मोब 9028371436
Please contact – Nilesh 9922390308