तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था आधीच भंगार झालेली असल्यामुळे सदर भंगार रस्त्यांवरून वर्षानुवर्षांपासून धावणाऱ्या बहुतांश बसेस सुद्धा अत्यंत भंगार अवस्थेत पोहोचल्या असून जवळपास सर्वच बसेसची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.
अनेक वर्षांपासून नवीन बसेसची आवश्यकता असताना शासनाकडून नवीन बसेस आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून न दिल्यामुळे कालमर्यादा संपलेल्या भंगार बसेसमधून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. ह्या भंगार गाड्या रस्त्यांवर कित्येकदा बंद पडत असून प्रवाशांना नाहक हेलपाटे सुद्धा सहन करावे लागतात. काही बसचे टायर रिमोल्डिंग पट्टे निघालेले असताना सुद्धा प्रवाशांच्या जिवाची पर्वा न करता त्या तसेच रस्त्यांवर चालवून भीषण अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. तेल्हारा आणि अकोट ह्या आगारात भंगार बसेसची संख्या सर्वात जास्त असल्याचे कळते. या क्षेत्राचे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे तथाकथित विकासाचे महामेरू, विकास महर्षी, असे बिरुद मिरविणारे विविध लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत काय ?? असा संतप्त सवाल दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.
तेल्हारा येथील आगारात मागील आठ वर्षांपासून बॉडी फिटर आणि वेल्डर नाहीत हेड मेकॅनिक आणि तज्ञ यांत्रिक सुद्धा कमी आहेत.
आवश्यक असलेल्या प्रमाणात साहित्य सुद्धा मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. बस भंगार होण्याचे मुख्य कारण भंगार रस्ते आहेत असेही एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकंदरीत मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळाच्या गाड्यांचा बट्ट्याबोळ झाला असून गाड्यांची भंगार अवस्था पाहता “कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा ?” असा स्वाभाविक प्रश्न या लोकप्रतिनिधींना निवडून देणारे मतदार आता विचारत आहेत. शासनाने त्वरित निर्णय घेऊन भंगार एसटी बसेस च्या जागी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून समोर येत आहे.
प्रतिक्रिया
मागणीच्या प्रमाणात नवीन एसटी बस मिळत नसल्याने आणि योग्य प्रमाणात साहित्य मिळत नसल्याने आमचा नाईलाज आहे.
नितीन महल्ले, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, तेल्हारा आगार
अनेक वर्षांपासून भंगार बसेसमुळे प्रवाश्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. विकास महर्षी लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत काय असा आमचा सवाल आहे.
धिरज संतोष बजाज, सामाजिक कार्यकर्ते, हिवरखेड
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM