पातूर (सुनील गाडगे)- एनआरसी सीएए या कायद्याविरोधात बहुजन मुक्ती मोर्चा द्वारे 29 जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान पातुरात दगडफेक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. या प्रकरणी आ. गोवर्धन शर्मा यांनी पातुर ठाणेदाराला जबाबदार धरून विधानसभा व विधानपरिषदेत ठाणेदारावर कारवाईसाठी आवाज उठविण्याचा इशारा दिला. दगडफेकीत नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी सुद्धा दोषींवर कारवाईसाठी प्रशासनाला निवेदन दिले.
सीएए कायद्याविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने 29 जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार पातुरातही बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला सहकार्य केले. परंतु त्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून वाहतूक कोंडी निर्माण केली. तर काही समाजकंटकांनी बंद दरम्यान दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. व्यावसायिकांचे नुकसान झाले. हे सर्व होत असताना पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत तोकडा होता. असा आरोप होत आहे. आ. गोवर्धन शर्मा यांनी 30 जानेवारी रोजी पातुरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ डिगंबर खुरसडे विजयसिंह गहिलोत राजु उगले दिलीप बगाडे नदकिशोर राऊत संदिप इगळे संदिप तायडे सचिन बायस अभिजित गहिलोत निशांत बायस सचिन बारोकार अजिंक्य निंमकडे नितीन खंडारे आशुतोष सपकाळ बाळु गोतरकार राजु निंमकडे श्रीकृष्ण इंगळे सागर रामेकर शेख नातिक शाम गुजर सचिन इंगळे आदि उपस्थित होते.
आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितले की बंद व रास्ता रोको ची माहिती मिळताच आपण जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु पातुरात पाहिजे तेवढा बंदोबस्त लावला गेला नाही. त्यामुळे दगडफेकीसारख्या घटना घडून व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक जण जखमी झाले. हे सर्व करणारे समाजकंटक सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहेत. त्यामुळे सर्व दोषींवर ताबडतोब कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा पातुरच्या ठाणेदाराविरोधात विधानसभा व विधान परिषदेत कारवाईचा प्रस्ताव मांडून ठाणेदारावर कठोर कारवाईची मागणी केली जाईल. असे आ. गोवर्धन शर्मा म्हणाले. झालेल्या सर्व प्रकाराला शासन आणि प्रशासन जबाबदार असल्याचा तसेच हे सरकार आल्यापासून अशा घटना घडायला लागल्या असल्याचा आरोप आ. गोवर्धन शर्मा यांनी यावेळी केला. आता पातुर ठाणेदार दोषींवर काय कारवाई करतात तसेच ठाणेदारावर सरकारकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चौकट
पातुर येथील समाजकंटकांकडून झालेल्या दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून व्यापारी प्रचंड दहशत आहेत यासंदर्भात भाजपच्या आमदारांना घेऊन राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटून संबंधितावर कारवाई करण्यासाठी करणार आहोत तसेच या घटनेची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना सुद्धा सांगितल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी यावेळी सांगितले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM