हिवरखेड(धीरज बजाज)- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील नियोजनशून्य कारभाराचा नमुना वाहनधारकाना आला असून हिवरखेड नजीकच्या गोर्धा दानापूर रोड वरील आस नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी बाजूला थांबवलेल्या पाण्याचे योग्य विल्हेवाट न लावल्याने सदर पाणी मोठ्या प्रमाणात पर्यायी रस्त्यावर जमा झाल्याने गोर्धा हिंगणी दानापूर रस्त्याचा संपर्क तुटला आहे.
विशेष म्हणजे सदर पाण्याच्या निकासी साठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश उपकार्यकारी अभियंता श्री आपोतीकर साहेबांनी मागील भेटीत स्पॉटवरच संबंधितांना दिले होते. परंतु त्यांच्या निर्देशांचे पालन झालेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच प्रवाशांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत असून अनेक किलोमीटर लांब अंतराने आपले गंतव्यस्थान गाठावे लागत आहे. त्यामुळे पैशांचा आणि वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8