हिवरखेड(दीपक रेळे)- हिवररखेड हिंदू खाटीक समाज बांधवांच्या पुढाकाराने गावातील सर्व समाज बांधव एकजूट होऊन हिवररखेड गावातील स्थानिक चंडिका चौक येथे, स्व वैष्णवीला श्रद्धांजली अर्पण करून ठाणेदारांना लेखी स्वरूपात सर्वांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले.
निवेदना मध्ये मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील वैष्णवी राजू गुजर या १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली, अद्यापही वैष्णवीच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही, वैष्णवीच्या मारेकऱ्यांनचा तात्काळ शोध लावून, त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या व वैष्णवीला न्याय द्या अशा प्रकारचे निवेदन हिवररखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना हिंदू खाटीक बांधवानसह सर्व समाज बांधव, सर्व पक्षीय व गावकऱ्यांनच्या वतीने देण्यात यावेळी, ठाणेंदार आशिष लव्हगडे, संजय हिवराळे, संदीप इंगळे, शांताराम कवळकार, पंकज ईलररकार, हिफाजत खा, प्रकाश खोब्रागडे, प्रदीप पाटील, रफिक खा, अनिल कवळकार, रामदास कवळकार रतन हिवराळे, पांडुरंग कवळकार, चंद्रप्रकाश ईल्लरकार, सुनील कवळकार अर्जुन खिरोडकार, आदी समाजबांधव उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8