तेल्हारा (प्रतिनिधी)- 24 जानेवारी देश्यातील ढसाळलेली आर्थिक स्तिथी आणि NRC, CAA, NPA सारख्या जाचक कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज दिनांक 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली होती त्या अनुषंगाने तेल्हारा तालुका बंद चे आव्हान करण्यात आले होते.
देश्यात नोटबंदी पासून आर्थिक स्थिती प्रचंड ढासळली आहे त्यामुळे देश्यातील छोटे मोठे शेकडो व्यवसाय मोडकळीस आहे आहेत तथा NRC, CAA, NPA सारखे जाचक कायदे शासनाने अस्तित्वात आणून त्यादृष्टीने भारताच्या संविधानाला सुद्धा हात लावण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्यामुळे याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली होती त्याअनुषंगाने तेल्हारा व हिवरखेड बंद चे आव्हान करण्यात आले होते.
या बंद मध्ये दवाखाने, अम्बुलन्स, मेडिकल स्रोअर्स यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु होत्या त्याव्यतिरिक्त संपूर्ण तेल्हारा तालुका व व हिवरखेड कडकडीत बंद ठेवण्यात आले.
या बंद मधे व्यापारी, व्यावसायिक यांनी मोलाचे सहकार्य केले. बंद यशस्वीपणे पार पाडन्यासाठी तेल्हारा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बंद मधे सहभाग घेतला.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4