बाळापूर (पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे ‘आमच गाव आमचा विकास ‘कार्यक्रमाअतर्गत ग्रामपंचायत सरपंच सौ नंदा अनिल दंदी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये वार्षिक आराखडा 2020 – 21 या वर्षांमध्ये कोणकोणती कामे करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सचिव आर आर इंगळे उपसरपंच मंगेश किसन गवई व ग्राम पंचायत सदस्य व तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री प्रमानंद धोटे व गावातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामसेवक आर आर इंगळे व सरपंच यांनी ग्राम पंचायत विकास आराखड्याविषयी माहिती दिली. व तसेच गावामध्ये पुढील वर्षात कोणकोणती कामे करावीत या विषयी चर्चा करून गावातील नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी सभेला गावातील पोलीस पाटील सुजय देशमुख गावातील नागरिक, पंचायत समिती महिला बचत गट, आशिष पुरी, ज्ञानदेव सिरसाट ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम पंचायत ऑपरेटर संदीप सिरसाट व सी एस सी केंद्र चालक पंकज इंगळे, इत्यादी उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4