तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील अडसूळ ते हिवरखेड व वरवट ते वणी वरूला या रस्तावरील धुळीमूळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे त्याची भरपाई देण्यात यावी व या सर्व बाबीला जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजयुमो तालुका अध्यक्ष सतिश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो ने तहसीलदार तेल्हारा यांना 20 जानेवारी ला निवेदन देउन केली.
तेल्हारा तालुक्यातील अडसूळ ते हिवरखेड व वरवट ते वणी वरूला भागात रस्ताचे काम सुरू आहे याकामामुळे संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्यावर धूळ होवू नये याकरिता कुठली उपाय योजना करण्यात आली नाही त्यामुळे धुळीच्या प्रदूषण मूळे नागरिकना श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या धुळीमुळे मोट्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच रास्ता लगतच्या शेतकऱ्यांचा पिकांचे सुद्धा धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसान चा सर्वे करून तात्काळ मदत द्यावी ही संपुर्ण संबंधित कंत्रादाराची आहे तसेच कंत्रादारा कडून रास्ताच्या कामात मुरुमा ऐवजी माती टाकला जात असल्याने धुळीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तरी संबंधित विभागाने कार्यवाही करावी धुळीमुळे होणारे प्रदूषण थांबवणाचे काम केले नाही व शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत मदत देण्यात यावी व नागरिक च्या जिविताशी खेळणाऱ्या संबंधित कंत्रादारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजयुमो वतीने करण्यात आली आहे तसे न झाल्यास भाजयुमो तीव्र स्वरूपाचे आदोलन करणार असा इशारा देण्यात आला.
यावेळी लखन राजनकर, मनीष डामर, गणेश इंगोले, आकाश फाटकर, राहुल झापर्डे, अश्विन म्हसके, समाधान सोनटक्के, प्रसाद कोलतकार, सचिन वासनकार ,आदित्य खरपकार, भावेश पवार, छोटू पाटील विखे, सौरव विखे, अक्षय कापसे, गणेश रत्नपारखी, सचिन सपकाळ, पुरुषोत्तम जायले, रामलाल शेळके, भूषण सोळंके, सलीम शहा, गणेश कवळे, विक्की नागपुरे निवेदन देतेवेळी भाजयुमो चे तालुका व शहरातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4