तेल्हारा (योगेश नायकवाडे)- एम एस इ वर्कर्स फेडरेशन अकोट विभागाचे वतीने केंद सरकारच्या वीज कायदा 2014 तथा महावितरण कंपनी मधील सुधारणा च्या नावाखाली नुकत्याच काढलेल्या mpr 117 च्या निषेधार्थ कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय अकोट च्या समोर वर्कर्स फेडरेशन च्या वतीने दि 6 जाने 2020 रोजी निषेध द्वारसभा संपन्न झाली. या सभेला अकोला झोन तांत्रिक सदस्य कॉ निलेश मगर, अकोला मंडळ चे जेष्ट सदस्य कॉ राजसिंग गोठवाल, अकोट विभागाचे कॉ तुषार जावरकर यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित वीज कायद्यामुळे, खाजगीकरणकरण मूळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार असून भविष्यात वीज उद्योग संपण्याच्या डाव सरकारने साधला असल्याचे आपल्या मार्गदर्शन करताना सांगितले. त्यानिमित्ताने वर्कर्स फेडरेशन व सब इंजिनिअर असोसिएशन च्या वतीने 8 जाने 2020 रोजी संपाची हाक देण्यात आली असून सर्व सभासदांनी या संपात सहभागी होऊन प्रास्तवित कायद्याला विरोध करावे असे आव्हान केले, यावेळी द्वारसभेला अकोट विभागीय सचिव कॉ योगेश राऊत, तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह, कॉ नरेन्द्र वानखडे, कॉ गणेश उज्जैनकर, कॉ हर्षल जांभोळे, कॉ भारती उगले, कॉ श्वेता देशपांडे, कॉ सचिन पांडे, कॉ संजय माकोडे, कॉ कमलेश घासे, कॉ अक्षय राऊत, कॉ सुनंदा काळे, कॉ अतुल काळे सहित वर्कर्स फेडरेशन चे सभासद उपस्थित होते.