मुर्तीजापुर (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक मुर्तीजापूर तालुक्यामध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता पेट्रोलींग करीत असाता त्यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुतीजापूर शहरातून दोन सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावरून मोठया प्रमाणात अवैधरित्या दारू ग्रामीण भागात पाठविली जाणार आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून सदर दोन्ही ठिकाणी भगतसिंह चौक मुर्तीजापूर तसेच चिखली रेल्वे गेट येथे नाकाबंदी करून सापळा रचून कारवाई केली असता नमूद दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेटया, ट्रॅक्स मालवाहू गाडी क्रमांक एम एच २७ एक्स १२१ तसेच मारोती ओमनी क्रमांक एम एच ३० एल ७१८१ असा एकूण ६,५३,६३२/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे १) अक्षय उर्फ सोनु मिलींद पंडागळे वय ३० वर्ष रा.रेल्वे स्टेशन सिध्दार्थ नगर मुर्तिजापुर २) पराग नरसिंग हितांगे वय २० वर्ष रा.रेल्वे स्टेशन गुरूव्दारा रोड मुर्तिजापुर ३) आकाश विश्वास पांडे वय २८ वर्ष रा.जुनी वस्ती देवरण रोड मुर्तिजापुर ४) गाडी मालक इशाद शहा रा जुनी वस्ती मुर्तीजापूर ५) गाडी मालक रोहीत अवलवार रा.मुर्तीजापूर तसेच फरार आरोपी एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द पो स्टे मुर्तीजापूर शहर येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये तसेच मोटर वाहन अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पो स्टे मुर्तीजापूर शहर पोलीस करीत आहेत.