अकोला (प्रतिनिधी)- होमिओपॅथिक महाविद्यालय अकोट रोड व जयस्वाल वेलफेयर फाउंडेशन अकोला च्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार दिनांक ४ डिसेंबर रोजी दहिहंडा येथे भव्य होमिओपॅथिक रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दहिहंडा येथील डॉ. नासिर खान यांच्या मानव सेवा क्लिनिकमध्ये हे एक दिवशीय आरोग्य तपासणी व औषधोपचार वितरण शिबिर आयोजित करण्यात येनार आहे. तसेच जवूळका येथे डॉ. जयस्वाल यांच्या दवाखान्यात येथेही हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात दमा, त्वचा रोग, संधिवात, पांढरे डाग, एलर्जी, स्त्रियांचे आजार, मुरूम, मूळव्याध, भगदर, किडनी स्टोन, किडनीचे आजार समवेत सर्व जुनाट आजारांवर तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे.
या शिबिरात होमिओ तज्ञ डॉ. जे. एम.जयस्वाल,डॉ. शिवदास बुटे, डॉ. करुणा जगताप डॉ. हेमलता लड्डड यांच्या सहकार्याने डॉ. शुभम राठी डॉ. अंकिता ठाकरे डॉ. अश्विनी बोरखडे डॉ. डॉ. सबाना डॉ. हुजेफा डॉ. जारा, डॉ. निकिता चावला, डॉ. प्रिया आहुजा, डॉ. सोना मोटवानी डॉ. असरा डॉ. मदीहा आदी रुग्ण तपासणी करणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचा रुग्ण महिला..पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन होमिओपॅथीक महाविद्यालय अकोट रोड अकोला चे सचिव डॉ. जे. एम. जयस्वाल, प्राचार्य डॉ. संजयकुमार तिवारी. सीएमओ डॉ. शिवदास बुटे आदींनी केले आहे.