तेल्हारा (विशाल नांदोकर)- ७ जानेवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी करीत आज २३ डिसेंबर ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच गर्दी झालेलेली दिसून आली असून तेल्हारा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आलेले पहावयास मिळाले आजपर्यंत ८ जिल्हा परिषद गटा करिता ऐकून ७९ तर पंचायत समिती च्या १६ गना करिता १०८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले तर शिवसेनेने ढोलताश्यांच्या गजरात तेल्हारा शहरातून भव्य रैली काढून आपल्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले सर्वच राजकीय पक्षांनी आजच ए बी फॉर्मचे वाटप केल्याने ज्यांना उमेदवार मिळाली नाही. अश्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने बंडखोरी झाल्याचे दिसून आले या मध्ये भारिप बमस व भाजपची संख्या जास्त असल्याचे समजते तर भारिप बमस ने जाहीर केलेल्या काही जणांच्या उमेदवारी वरून त्यांच्या कार्यकर्त्यांन मध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी ला सुरुवात झाली असून तेल्हारा तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटामधून या पूर्वी २४ तर १६ पंचायत समितीच्या गणामधून २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ८ जी. प. गटा मधून एकूण ७९ तर १६ प. स. गना मधून १०८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं तहशीलवर मोठी गर्दी झाली होती तर शिवसेनेने तेल्हारा शहरातून भव्य रॅली काढून आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आयोजित रैल मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते जवडपास सर्वच राजकीय पक्षांनी आजच आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करून ए बी फॉर्म दिल्याने अनेकांची उमेदवारी वेळेवर कटल्याचे दिसून आले ज्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी मिळाली नाही अश्या काहींनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतल्याची दिसून आली तर काहींनी आपलं ठरलंय म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे दिसून आले त्यामुळे तेल्हारा तालुक्यात आज दाखल करण्यात आलेल्या अर्जानवरून मोठ्या प्रमाणात बंडखोरो झाल्याचे दिसून आले तसेच मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा जिकून विजय संपादन केलेल्या भारिप बमस ने या वेळेस जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे अनेक ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्या बद्दल त्याचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहेत.
उमेदवारी निश्चित करतांना आजपर्यंत भारिप बमस कडून जे निकष लावण्यात येत होते ते या वेळेस लावण्यात आले नसल्याचे बोलल्या जात याचा पक्षाला फटका बसणार असल्याचे भारिप बमस च्या कार्यकर्ते सांगत आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हिवरखेड जिल्हा परिषद गटा मध्ये शिवसेनेच्या उमेदवारानी अर्ज भरून तयार ठेवले होते परंतु ए बि फॉर्म त्यांना उशिरा मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढल्याचे दिसून आले.
दोन टर्म शिवसेनेने प्रतिनधित्व केलेल्या पाथर्डी जिल्हा परिषद गटा करिता या वेळेस शिवसेनेवर पार्सल उमेदवार देण्याची वेळ आली हे येथे उल्लेखनीय स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उमेदवारी घेतली नाही की पक्षाने दिली नाही हे मात्र समजू शकले नाही. ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. आर.जी. पुरी काम पाहत आहेत.