अकोला(प्रतिनिधी)- शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, मा.आ. संजय गावंडे, प्रहारचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, गोपाल भाऊ दातकर, मुकेश भाऊ मुरूमकार तसेच प्रहारचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे सर्किट हाऊस वर युतीबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न व युतीवर शिक्कामोर्तब. तसेच यावेळी उपस्थितांनी बैठकीत येणाऱ्या ७ तारखेला होऊ घातलेल्या जि.प.पं. समिती निवडणूक मध्ये शिवसेना आणि प्रहारच्या सर्व उमेदवारांना निवडून आनण्यासाठी दोन्ही पक्षाच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिक प्रहार सैनिक यांनी एकमताने प्रयत्न करावे असा निर्धार केला.