अकोला(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य बेरोजगार अप्रेंटिस शिप कृती समिती अकोला जिल्हा यांच्यावतीने राज्याचे ऊर्जामंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे. महावितरण कंपनी विद्युत सहाय्यक विद्युत उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी जाहिरात 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती या भरती प्रक्रियेमध्ये या भरती प्रक्रियेमध्ये तसेच कंत्राटी कामगार व ज्येष्ठतेनुसार वयाचा विचार कंपनीने करावा शासकीय नियमानुसार वय वाढवावे अप्रेंटिस तसेच कंत्राटी कामगार हे रोजगारापासून वंचित होऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा बेरोजगारांना योग्य तो न्याय द्यावा.
एसएससी टक्केवारीवर भरती प्रक्रिया घेत असाल तर आयटीआय अप्रेंटिस कशासाठी करावी आयटीआय अप्रेंटिस तसेच आउटसोर्सिंग चा विचार करावा वयोमर्यादा शासकीय नियमानुसार अकरावी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यात यावे विद्युत सहाय्यक व विद्युत उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी सरळ सेवा भरती घ्यावी ज्येष्ठतेनुसार वयाचा विचार करून तसेच महावितरण कंपनी मध्ये कामगार कल्याण मंडळात नोंदणी करून आउटसोर्सिंग यंत्रचालक व तांत्रिक कामगार कंत्राटदाराकडून होणारी पिळवणूक टाळण्याकरिता आमची नोंद कामगार कल्याण मंडळा मध्ये घेण्यात यावी कंत्राटी पद्धतीत न ठेवता कामगार कल्याण मंडळ कडून कंपनीमध्ये कार्यरत ठेवावे कामगारांचे वेतन हे कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात यावे ही विनंती एका निवेदनाद्वारे अप्रेंटिस कृती समिती जिल्हाध्यक्ष प्रफुल बोदडे अकोट येथील काँग्रेस नेते मोहम्मद बद्रू जन्मा असंघटित प्रदेश अध्यक्ष असंघटित कामगारांना संघटित करणे व त्यांना न्याय मिळवून देणे अशी ख्याती आहे यांनी सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये नोंद करून महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी शब्द काढून कायमस्वरूपी न्याय मिळवून दिला आहे.
या वेळी उपस्थित सर्व कंत्राटी कर्मचारी प्रफुल बोदडे अतुल बाळापुरे हरीश निमकर्डे विनोद कुकडे सागर ढोले अंकुश निमकर्डे प्रवीण घन बादुर रामेश्वर चंदन नागोराव मांजरे दिनेश गवई विलास सपकाळ प्रफुल गिरे सुदाम भगत योगेश खोदिलं उपस्थित होते.