अकोट(देवानंद खिरकर)- अकोट-अकोला मार्गावर भरधाव वेगाने कार चालवित एका बँक मैनेजरने दुचाकीस उडविले. यामधे दोन जण जखमी झाले तर एक 12 वर्षीय मुलगा सुदैवाने वाचल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. कार चालक बँक व्यवस्थापकाला अकोटशहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
अकोट येथिल ऐक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक अर्पित उर्फ भास्कर मिश्रा हे अकोला मार्गाने एमएस 27 बिई 8016 ने जात होते. मिश्रा यांनी कार भरधाव नेत एम एच 30 एयू 9781 क्रमांकाच्या दुचाकीला उडविले. यावेळी मोटारसायकल सोबत असलेले प्रफुल्ल गिरी व सौरभ म्हैसने रा. लोहारी हे दोघे जखमी झाले तर अथर्व काळमेघ हा 12 वर्षीय मुलगा शिकवणीवरुण घरी येत होता. तो या अपघातात सुदैवाने बचावला. कार रस्त्याच्या खाली जाऊन झुडपात अडकली. कार चालक यांना पोलिस स्टेशनला आणले असता मद्यधुंद असल्याचे पोलिसांना दिसून आले. याप्रकरणी अकोटशहर पोलिसांनी बँक व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री ऊशिरापरंत सुरु होती.