तेल्हारा( प्रतिनिधी )- तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सागंवि हिवरे येथील जिल्हा परिषद शाळा अत्यंत शिकस्त झाल्याने येथील मुले जिव धोक्यात घालून शिक्षण ग्रहण करण्याची पाळी आली आहे येथे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा सवाल पालकांनी केला आहे.
तेल्हारा तालुक्यातील सागंवि हिवरे येथे जिल्हा परिषद चि शाळा असुन वर्ग एक ते चार आहे मुलांना शिक्षणाचे धडे घेण्यासाठी दोन वर्ग खोल्या आहेत सदर वर्ग खोल्या 1962सालि बांधकामा झाले आहे दोन्ही खोल्या अत्यंत शिकस्त झाल्याने मुलांना बसण्यासाठी धोकादायक आहे सदर खोल्या बाबतीत येथिल मुख्याध्यापक यांनी तसा अहवाल वरिष्ठांकडे पाच ते सहा वेळा पाठविण्यात आला आहे मात्र या बाबतीत वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही येथे काही अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल पालकांनी केला आहे.
यात सदर खोल्या वर इंग्रजी कौल आहे या कौलावर दि 16डिसेबर रोजि माकडानि धुमाकूळ घातल्याने पाच सहा कौल फुटुन वर्गीत पडल्याने मुले डेक्स बेंच खाली लपून बसले नंतर शिक्षकांनी माकडांना हाकलून लावले. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही खोल्या अत्यंत शिकस्त झाल्याने मुलांना शिक्षणाचे धडे घेणे कठीण झाले आहे संबंधितांनी या बाबिकडे लक्ष पुरवुन नविन बांधकाम करिता परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे.