अकोला (प्रतिनिधी)- अकोला शहरात एकाच वेळेस सर्व महत्वाच्या रोड चे बांधकाम सुरू असल्याने व वाहतुकी साठी अगदी कमी रोड शिल्लक राहिल्याने वाहनांची गर्दी व रोड वरील धूळ ह्या कारणाने प्रमुख चौका मध्ये प्रदूषणाची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अकोला शहर प्रदूषित पहिल्या 5 शहरात आले आहे. अश्या प्रदूषित वातावरणात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, ट्राफिक जाम लागून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचारी धूळ आणि धुराने भरलेल्या चौकात सतत उभे राहून वाहतुकीचे नियोजन करतो.
परंतु प्रदूषित हवे मध्ये सतत उभे राहिल्याने वातावरणातील धुळीचे बारीक कण श्वसना वाटे फ्फुफूसात गेल्याने सध्या वाहतूक पोलीस वेगवेगळ्या श्वसनाच्या आजाराने ग्रस्त झालेला दिसून येत आहे. सर्दी, खोकला, दमा ह्या सारख्या विकारा मध्ये वाढ झाल्याचे दिसून आल्याने अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रदूषणा पासून सौरक्षण करणारे मास्क चे वाटप वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्त्यव्याच्या ठिकाणी जाऊन केले. सदर मास्क मुळे काही प्रमाणात का होईना प्रदूषणा पासून वाहतूक कर्मचाऱ्यांचे संरक्षण होईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिली.