अडगाव बु.(दीपक रेळे)- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत लिंक वर्कर स्किम भाग्योदय आरोग्य व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला यांच्यावतीने जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु. येथे विद्यार्थ्यांना एचआयव्ही-एड्स, गुप्तरोग व टीबीविषयी माहिती देण्यात आली त्याची कारणे,लक्षणे व दुष्परिणामआणी यावर आळा कशाप्रकारे घालता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच याविषयी समाजात असलेले गैरसमज व अज्ञान याविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. सर्वांनी आपली विवाह पूर्वी एच.आय. व्ही. ची तपासणी करून घ्यावी असा निर्णय घेण्यात आला. यावेळी डी.आर.पी. श्री. सुरजसिंग जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य श्री.जाधव सर श्री. इंगळे सर श्री. गावंडे सर श्री. सेवलकर सर सी.एल.डब्ल्यू. संतोष दामोदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.