हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथून जवळच असलेल्या वान वनपरिक्षेत्र अंतर्गत मध्यप्रदेशातून गौवंश अवैधरित्या घेऊन येत असताना वन विभागाने धाडसी कारवाई करीत सदर 25 गोवंश जप्त करून आरोपीवर कारवाई केली. या धाडसी कारवाईमुळे आणि मागील इतिहास पाहता हिवरखेड हे आंतरराज्यीय गोवंश तस्करीचे मुख्य केंद्र असल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
सविस्तर असे की हिवरखेड पासून काही अंतरावरच सातपुडा पर्वत आणि मेळघाट सुरू होत असून मध्य प्रदेश चे प्रवेशद्वार म्हणून हा परिसर ओळखला जातो. येथून जवळच येणाऱ्या वान वनपरिक्षेत्र अंतर्गत धुलघाट ते वान दरम्यान STPF (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स चे अधिकारी-कर्मचारी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागरतास वर्तुळात वनविभागाच्या संरक्षक क्षेत्रांमधून पंचवीस बैल अवैधरित्या घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे सापळा रचून धुलघाट ते वान परिक्षेत्रा दरम्यान विभागाने 25 बैल जप्त केले. वनविभागाने ही केलेली कारवाई अत्यंत मोठे समजले जात आहे.
संरक्षित वन क्षेत्रामधून पायी जनावरे आणण्यास मनाई असताना सुद्धा गुरांच्या तस्करीचे वेगवेगळे पद्धत अवलंबत तस्करांनी लपून छपून गवक्ष तस्करीचा गोरखधंदा सुरूच ठेवला होता. त्यातच ही कारवाई झाल्यामुळे गवच तस्करांचे धाबे दणाणले आहेत काही दिवसाआधी सुद्धा 14 बैल जप्त करण्यात आले होते. एलसीबी ने सुद्धा काही महिन्यांपूर्वी धाडसी कारवाई करीत हिवरखेड परिसरातून शेकडो गोवंश जप्त केले होते. त्यामुळे हिवरखेड हे आंतरराज्यीय गौवंश तस्करीचे प्रमुख केंद्र असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वनविभागाची सदर धाडसी कारवाई वनसंरक्षक श्रीमती टी बेऊला मार्गदर्शनाखाली फिरते पथक वन अधिकारी बी.टी. कटारिया, वनपाल केने, भारती ठाकूर, वनरक्षक चिमोटे, विखे, बाळासाहेब खोडवे, कैलास चौधरी, सुरेश वाकोडे, दिपक सोनोने, उईके , इत्यादींनी ही कारवाई केली. वन कायदा 1927 व 1972 च्या कलमान्वये सदर बैलांना जप्त करून आरोपी शेख नाजीम शेख इकरामोद्दीन याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.