तेल्हारा प्रतिनिधी : आज समाज व्यवस्थेचे रूप पाहता पूर्वीपेक्षा पार बदललेले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ समजल्या जातो तरी निरपेक्ष निर्भीड पत्रकारिता करीत असतांना पत्रकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कुठं कुठं तर पत्रकारांवर जीवघेणे हल्ले देखील होतात. सारख्या अनेक समस्याबाबत पत्रकारांचे संघटन फार महत्वाचे आहे त्या अनुषंगाने तेल्हारा तालुका ग्रामिण पत्रकार संघ यांच्या वतीने तालुका अध्यक्ष दिपक दारोकार यांनी बैठकीचे आयोजन केले.
तेल्हारा तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीस अकोला जिल्हाध्यक्ष अहेमद भाई यांच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख मार्गदर्शक म.रा.ग्रा.प. संघाचे संस्थापक उपाध्यक्ष श्री. शैलेश अलोने, मानकर साहेब, प्रकाश आमले, गणेश वाकोडे यांची उपस्थिती होती.
आज पत्रकारांच्या वेगवेगळ्या समस्यासाठि संघटना कशा प्रकारे कार्य करत आहे. पत्रकार कायदा लागू करण्यसाठी संघटनेने कशा प्रकारे कार्य केले या संबधीत उपस्थित मार्गदर्शकानी मार्गदर्शन केले.
बैठकीचे औचित्य साधून नवीन पत्रकार लोकांची संघटनेत नियुक्ती करण्यात आली यामधे प्रा.विकास दामोदर( GTPL news प्रतिनिधी )यांची संघटनेच्या सल्लागार पदी, राजेंद्र तायडे (सुपर फास्ट सिटी न्युज ) यांची उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .सदर कार्यक्रमास सुनिल तायडे, नानाभाऊ इंगोले, सिद्धार्थ गवारगुरु, गुरुदेव ईसमोरे, भगवान घुले, शेखर तेलगोट तसेच बरेच ग्रामिण भागातील पत्रकार बंधु उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विकास दामोदर तर आभार प्रदर्शन दिपक दारोकार यांनी मानले.