मोबाइलमधील फेसबुक, व्हॉटस्अँप यासारख्या माध्यमातून इतरांशी सतत संवाद साधला जातो. एकमेकांची ओळख नसताना मैत्री केली जाते. त्यातून खोटीनाटी आश्वासनं दिली जातात. याहून गंभीर म्हणजे अनेक विवाहित स्त्रिया या मोहाला बळी पडतात. यातून घरी पती-पत्नी एकदुसऱ्यांना कमी आणि मोबाईलवर सोशल मिडियाला जास्त वेळ देतात.खामगाव पोलीसांच्या आकडेवारीनुसार 50 टक्के संसारात मोबाईल-सोशल मिडिया वीष कालवत आहेत.
नविन टेक्नॉलॉजी,नव नवे मोबाईल, कॉम्प्युटर-लॅपटॉप आपल्या विकासासाठी आहेत. सोशल मीडियाही आपल्याला जगाशी कनेक्ट ठेवतो. पण या नादात आपले हक्काचे घरचे लोक मात्र दूर जातात. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी, कारण जिथे अति होतं तिथे माती होते, हेच घरगुती वादाच्या अनेक केसेसमध्ये दिसून आलं आहे.पती सकाळी कामावरून आल्या नंतर सायंकाळी एकदुसऱ्यांना देण्याचा वेळ, मात्र सध्या बरेच पती-पत्नी मोबाईलवर फेसबूक, व्हॉटसपला जास्त देतात. यातूनच घरगुती वादाची ठिणगी पेटली जाते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीसांच्या महिला समुपदेशकेंद्राकडे दोनशे आसपास घरुगुती भांडणाच्या केसेस येतात. त्यापैकी ५० टक्के कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे वीष कालवलं जातंय. पोलीसांनी घरगुती वाद सोडवण्यासाठी महिला समुपदेशन सेलची सुरुवात केलीय. या समुपदेशन केंद्रात एकट्या तालुक्यातमागील अकरा महिन्यात एकूण १४५ प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी ६३ प्रकरणे समुपदेशाद्वारे सोडविण्यात आली असून ५ प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहे. तर काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहचलेली आहे.
मात्र यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मोबाईल, व्हाटसअप्प, फेसबुक यावरून झालेल्या वादाचे असलयाचे वास्तव समोर आले आहे. हूंडा,घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नंपुसकता. पूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात यासारखी कारणं दिली जायची. पण आता हायटेक युगात मोबाईल आणि सोशल मिडियाचा अतिवापरंही घटस्फोटाच कारण ठरतंय. घरात फेसबूक आणि व्हॉटसपचा अतिवापर हि सुखी संसार विष कालवत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. ‘समा है सुहाना सुहाना, नशे मै जहा है. किसी को किसी की खबर ही कहा है’ या किशोर कुमार यांच्या गाण्यातील ओळी आजच्या तरुणाईला किंबहुना सर्वांनाच खूप काही शिकवून जातात. त्या गाण्यातील ‘नशा’ या शब्दाचा अर्थ ज्याला आपण माहितीचे महाजाल म्हणतो त्या इंटरनेटचा मानवी जीवनातील अतिरेक या संदर्भात आहे. मानवी जीवनात इंटरनेट आल्यापासून जग जवळ आलं. पण जवळच्या गोष्टी तितक्याच लांब गेल्या असंच म्हणावं लागेल. संसारात सुसंवाद नसल्यामुळे भांडणं-तंटे उद्भवण्याची शक्यता होत आहेत. वेळ, काळ, मर्यादा पाळल्यास सोशल मीडीया हे तरुणाईसाठी वरदान आहे एव्हडे मात्र खरे.