अकोला(प्रतिनिधी)- जनतेच्या सहकार्या शिवाय पोलीस आपले काम करू शकत नाही हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी म्हटले होते, समाजात शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस रात्रंदिवस कार्यरत असतो परंतु तरीही समाज त्याची पुरेशी दखल घेतांना दिसत नाही व त्या मुळे पोलिसांचे कार्य हे थँक्स लेस कार्य आहे ही भावना पोलिसां मध्ये निर्माण होते व त्याचे प्रतिबिंब बऱ्याच वेळेस त्यांचे कामावर सुद्धा पडते परंतु समाजात अशाही काही संघटना व सकारात्मक प्रवृत्ती असतात ज्या चांगल्या कामाची पावती देऊन चांगले काम करण्यास प्रेरणा देतात, दिनांक 25।11।19 रोजी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी पूजा दांडगे, आश्विनी माने ह्या सिविल लाईन चौक येथे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना महत्वाचे कागदपत्रे मिळाली होती.
त्यांनी त्या कडे दुर्लक्ष न करता सदर कागदपत्रे वाहतूक कार्यालयात जमा केली सदर कागद पत्रावर कोणताही पत्ता किंवा संपर्क क्रमांक नसल्याने फक्त बँकेच्या खाते क्रमांकावरून शोध घेऊन सदर कागदपत्रे सेवा निवृत कर्मचारी प्रभाकर बळीराम काटकर ह्यांना सुरक्षित सुपूर्द करून वाहतूक कर्मचाऱ्यांनी जी माणुसकी दाखविली त्या माणुसकीचा सत्कार रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला तर्फे शहर वाहतूक कार्यालयात पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचारी पूजा दांडगे ह्यांचा पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला, ह्या प्रसंगी ऍड गजानन तेलगोटे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना, उमेश इंगळे जिल्हा प्रमुख युवक आघाडी, मिनाक्षीताई तायडे महिला आघाडी अध्यक्ष, उषाताई परवले, अविनाश टाले, सतीश तेलगोटे, कुलदीप डोंगरे, श्रीकृष्ण मोहोड ह्यांनी केला व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या माणुसकीला सलाम केला।