अकोला (प्रतिनिधी)- रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने रिपब्लिकन सेना अकोला जिल्हा प्रमुख ॲड.गजानन तेलगोटे यांचा वाढदिवस तुळशिरामजी बगाटे मुकबधीर विद्यालय कैलास टेकड़ी अकोला येथे साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेला वंदन करून सुरवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यानां फराळाचे वाटप करण्यात आले सोबतच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यानां वह्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला हे होते तर प्रमुख मार्गदर्शक विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार साहेब व जितेंद्र भाऊ बगाटे होते प्रमुख उपस्थिति म्हणुन रिपब्लिकन सेना युवक आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश भाऊ हातोले, महासचिव महेंद्र भाऊ खंडारे,जिल्हा सचिव राजरत्न वानखडे,बाळापुर तालुका प्रमुख दिलीप दंदी साहेब, महीला आघाड़ी च्या मिनाक्षीताई तायडे, शोभाताई खडसे व ईतर तुळशिरामजी बगाटे मुकबधीर विद्यालयाचे शिक्षकवृंद व कर्मचारी व रिपब्लिकन सेना युवक आघाडी,चे पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सतिश भाऊ हातोले यांनी तर आभार प्रदर्शन राजरत्न वानखडे यांनी केले.