अकोला(डॉ शेख चांद)- भारतीय संविधान गौरव दिन अकोल्यात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग एक, एम. आय. आरलँड यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्वरूप बोस, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी भारतीय संविधान दिनानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते.
यात सर्व न्यायाधीश, वकील मंडळी, विधी स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे अध्यक्ष, बार कौन्सिलचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, न्यू इंग्लिश शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं या शोभायात्रेचा समारोप झाला.