अकोला (दिपक गवई)- अकोला महापालिका महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने 13 काँग्रेस च्या नगरसेवकांनी मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात आली नाही. तर एमआयएम,शिवसेना, वंचित बहुजनआघाडी हे तटस्थ राहिले.तर भाजप च्या 48 नगरसेवकांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचा विजय झाला.
नवीन महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका अर्चना मसने आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र गिरी यांचा विजय झाला.अकोला महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजप कडून अर्चना जयंत मसने व राजेंद्र गिरी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. महापालिका नगरसेवकांची 80 एवढी संख्या आहे भाजपचे 48 नगरसेवक असल्याने सगळ्यात जास्त संख्या त्यांचेच आहे. तर काँग्रेसचे 13 राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे मिळून 26 असे संख्याबळ आहे.
त्यामुळे महापौर अर्चना मसने आणि उपमहापौर राजेंद्र गिरी यांची निवड झाली आहे. कांग्रेसकडून महापौर पदासाठी अजरबी नसरीन मकसूद खान व उपमहापौर पराग कांबळे यांचा पराभव झाला. निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, मनपा आयुक्त जितेंद्र कापडणीस उपस्थित होते. विजयी झालेल्या महापौर आणि उपमहापौर यांच्या स्वागतासाठी एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी आतिषबाजी करून गुलाल उधळण्यात आला. त्यासोबतच विजयी मिरवणूक काढण्यात आली