तेल्हारा(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्या लागू झाल्याची गॅझेट प्रत तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तेल्हारा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सुधाकर गवारगुरू यांना दि २२ नोव्हेंबर रोजी सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडत असतांना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसार माध्यमातील व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था यांच्या मालमतेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत संबंधीत व तदानूशंगीत बाबीसाठी तरतूद करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती यांच्या संमती नंतर अधिनियम करण्यात आले.त्याची प्रत तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख,परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब,सरचिटणीस प्रमोद लाजूरकर यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे,सुरेश शिंगणारे,सत्यशील सावरकर,रामभाऊ फाटकर,प्रशांत विखे,धर्मेश चौधरी,निलेश जवकार,अनिल अवताडे,आनंद बोदडे,विशाल नांदोकर,अमित काकड,पंकज भारसाकळे,राहुल मिटकरी, शुभम सोनटके,अनिल भाकरे,रक्षित बोदडे हे प्रत देतेवेळी पत्रकार उपस्थित होते.