अकोला(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. त्यावेळी राज्यभरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडतीवर एक नजर टाकूया ग्राफीक्सच्या माध्यमातून
– जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
* नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर