अकोट(देवानंद खिरकर)- अकोला जिल्हाची संस्कृतीक राजधानि ऐतिहासिक वारसा असलेल्या अकोट ची अध्यात्मिक ओळख सुद्धा मोठी आहे. अकोट ची हिच अध्यात्मिक ओळख दृढ केली आहे ते या येथील ग्राम दैवत असनाऱ्या श्री. संत नरसिंग महाराजांनि नरसिंग महाराज हे वारकरी संप्रदाय परंपरेतील मोठे संत त्यांच्या अध्यात्मिक आवडीला पैलू पडण्याचे काम केले ते उमरा या गावतील त्यांचे गुरु श्री. मिनानाथ महाराजांनी बालपनापासूनच नरसिंग महाराजांनि पंढरपुर सह देहू आळंदीच्या वारी करने सुरु केले आनी यातूनच नरसिंग महाराजांचा सर्व सामन्य माणुस ते वारकरी परंपरेतील महान संत असा प्रवाह सुरु झाला. नरसिंग महाराजांना पांडूरंगाचे वैध म्हणून ओळखले जायचे. त्यांनी जिवंतपणीच आपले समाधी मंदिर बांधून ठेवले होते.
विठ्ठल रुख्मीणीच्या मंदीर समोर नरसिंग महाराजांची समाधी आहे. या शिवाय गावामधे नरसिंग झोपडी हे महाराजांच्या तपचर्या आनी राहन्याचे ठिकाण आहे. मंदिराच्या बाजुला मन्कनिका विहिर आहे.याच विहीरीवर बसल्यावर विहीरिच्या पाण्याचे तरंग तयार होवुन नरसिंग महाराज आनी गजानन महाराज यांना साचेल आघोळ घातली असे सांगतात. 1987 मधे अनेक संताच्या उपस्थितीत त्यांनी समाधी घेतली. कार्तिक पौर्णिमेला इथे तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. ही यात्रा जवळपास एक महिना चालते.