बाळापूर ( डॉ चांद) : वाडेगांव येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि प शाळा ( मुले ) येथे दिनांक १६ नौव्हेंबर रोजी दुपारी शाळेत वाडेगांव परिसरातील पत्रकारांचा राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष संतोष काळे हे होते.
तसेच यावेळी प्रमुख पाहुने म्हणुन पत्रकार तथा शाळा व्यवस्थापन समीती उपाध्यक्ष डॉ एस चांद, पत्रकार उमेश म्हैसने, पत्रकार राजेंद्र पल्हाडे, पत्रकार राहुल सोनोने ,पत्रकार इब्राहीम पेंटर, पत्रकार सचिन धनोकार, पत्रकार उज्वल महाजन , पत्रकार अमोल अकोटकर, वरील सर्व पत्रकार मंडळीचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याद्यापक समाधान सोर सर यांनी तसेच ज्ञानेश्वर पुंडकर सर, विवेकानंद वाकोडे सर, गजानन लांबटोंगळे सर, रामदास वाघ सर, राठोड सर, तडस सर, कंडारकर सर , विशाल अवचार इत्यादी नी सत्कार केला, यावेळी मुख्याद्यापक समाधान सोर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगीतला की पत्रकार हे नेहमी दुसऱ्यांचे सत्कार, सभा , इतर कार्यक्रमात सहभागी असतात त्यांचा कधीच सत्कार होत नाही तसेही ते सत्कारा पेक्षा आपल्या कामात मगन असतात. म्हणून आज राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त आमच्या शाळेच्या वतीने पत्रकार मंडळीचा सत्कार करण्यात येत आहे .
तसेच अम्हाला अभिमान आहे की आमच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापण समीतीचे अध्यक्ष संतोष काळे पत्रकार, तसेच उपाध्यक्ष डॉ एस चांद पत्रकार तथा चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचे सहकार्य नेहमी अम्हाला लाभत असते. त्याच प्रमाने इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन सुधिर घाटोळ सर यांनी तर आभार राठोड सर यांनी व्यक्त केले.