हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- स्थानिक हिवरखेड येथील माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर काशिनाथ जी शा. तिडके यांनी त्यांच्या जीवन कार्यात केलेल्या सामाजिक सेवेची आठवण म्हणून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिवरखेड येथे स्वर्गीय डॉ. का. शा. तिडके स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम दिनांक 17 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आली. सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री. दीपक पाल महाराज भांडेकर, वर्धा यांच्या समाज प्रबोधन पर किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन कराळे संदीप इंगळे, श्याम शील भोपळे, रमेश दुतोंडे, प्रकाश खोब्रागडे, सुनील इंगळे, सुरेश गिरे, प्रवीण येऊल, मनीष भांबुरकर, विलास अरबट, प्रदीप खूपसे, रामेश्वर जी बरघट, प्राध्यापक डॉक्टर गणेश राव ठाकरे, रमेश राव राऊत, नागपुरे कृष्णा भाऊ तिडके डॉ. राम तिडके उपस्थित होते.
स्वतःसाठी जगला तो मेल दुसऱ्यासाठी जगला तो खरा जीवन जगला डॉक्टर काशिनाथ तिडके हे दुसऱ्या साठी जीवन जगले म्हणून आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत असे उदगार आपल्या कीर्तनातून भांडेकर महाराज यांनी मांडले.
प्राध्यापक डॉक्टर गणेशराव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर साहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन महेंद्रजी कराळे प्रास्ताविक उमेश तिडके उपस्थितांचे आभार प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब नेरकर यांनी व्यक्त केले. तसेच वरील स्मृती प्रतिष्ठान च्या आयोजीत या कार्यक्रमाला विकासमहर्षि आमदार भारसाकळे यांनी सूद्दा भेट दिली.
दिनांक 18 नोहेब्मर रोजी डाॅ का.शा.तिडके यांच्या पुण्यतीथी निमीत्त गरजु रुग्णाकरीता मोफत दंत तपासनी, रोगनिदान औषध वाटप व नेञ तपासनी चष्मावाटप शिबीराचे आयोजन कला व वाणिज्य महाविध्यालयात घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा गणेश ठाकरे तर अथिती म्हनून सत्यसाई मेडीकेअर प्रोजेक्ट अकोला येथील डाॅ सारडा सर डाॅ थोरात साहेब डाॅ वृषाली खोब्रागडे, डाॅ राम तिडके यानी स्व डाॅ का. शा. तिडके यांचे प्रतीमा पुजन व दिप प्रज्वलन करुन रुग्ण तपासनीस सूरवात केली यावेळी ३५० रुग्नानी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरास सत्यसाई मेडीकेयर तथा डाॅ राजेश कांबे डेंटल काॅलेज अकोला याचें वीशेष सहकार्य लाभले.
सदर दोन्ही दिवस झालेल्या कार्यक्रमाकरीता रवी मानकर लक्ष्मन धांडे,मंगेश मोरोकार, योगेश सोनोने सजंय मोडक बाळासाहेब नेरकर दत्ता कूलकर्णी गजानन भटकर. प्राचार्य अरुण हागे प्रा अरुन तायडे प्रा,खूमकर प्रा दूधेसर प्रा.अदुंरकर मनिष गोरद प्रा वानखडे. प्रा आंबेकर प्रा.वासनकर सूधा डालके रमेश मानकर गजानन डालके बजरग तिडके ऊमेश तिडके केलास तिडके कृष्ना तिडके सूनील तिडके. गजानन तिडके मयूर धांडे निषांत तिडके राम चीतोडे सूनिल निंबोकार निखील गीर्हे. दिलीप बाळापुरे रामेश्वर शिंगने यानी विषेश प्रयत्न केले.