अकोला- पत्रकारांचे संघटन आणि समस्या निर्मुलनासोबतच सामाजिक समस्यांना वाचा फोडून दुर्बल घटकांकरिता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजकार्यात सतत सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघ व ज्ञान प्रभात विकास प्रबोधिनी कडून शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तथा दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक न्यू तापडिया नगर, खरप रोड, अकोला येथील संत गजानन महाराज मंदिरात सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत हे शिबिर ठेवण्यात आले असून सकाळी दहा वाजता पासून नाव नोंदणी ला प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा शाखा व ज्ञान प्रभात विकास प्रबोधिनी कडून गेल्या दोन वर्षातील हे तिसरे शिबिर असून यासोबतच आर्थिक दुर्बल निराधार व आत्महत्याग्रस्त कुटुंबांमध्ये विविध आवश्यक वस्तूची मदत अशा उपक्रमांचे आयोजन नेहमी होत असते. या वेळी फक्त शिबिराचे आयोजन केलेले आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्री संतोषजी हुशे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अकोला महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजयजी कापडणीस हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दमानी नेत्र रुग्णालय व इनरव्हील क्लब ऑफ अकोला यांचे सौजन्याने संपन्न होणाऱ्या या शिबिरात निर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेशराव देशमुख, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष पिडीसी आशाजी मालीवाल, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ. निताजी पंड्या, महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेशजी ठाकूर, दमानी नेत्र रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक श्री सभापती शुक्ल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी दमानी नेत्र रुग्णालयाचे मुख्य नेत्र विशेषज्ञ डॉ. श्री मनिष हर्षे व वरिष्ठ नेत्र विशेषज्ञ डॉ. निनाद घाटे हे रुग्णांची तपासणी करतील. तर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्री योगेश साहू दंत रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे विनामूल्य आणि गरज पडल्यास त्यांचे पुढील उपचार सवलतीच्या दरात करून देतील.या कार्यक्रमात दमानी रूग्णालयाच्या सौ. गवई मॅडम व त्यांच्या सहकारांचीही सेवा उपलब्ध राहणार आहे.
या विनामूल्य नेत्रतपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत दंत तपासणी चिकित्सा व उपचार शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, इनरव्हिल क्लबच्या महिला पदाधिकारी, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष डॉ. अनुपकुमार राठी, उपाध्यक्ष निषाली पंचगाम, डॉ. योगेश साहू, सचिव राजेंद्र देशमुख व पत्रकार संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी केले आहे.