हिवरखेड(धीरज बजाज)- महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 47 अकोट-हिवरखेड- जळगाव जामोद रोडवर हिवरखेड नजीक असलेल्या बगाडा नाल्याच्या मोठ्या पुलाजवळ वान धरणातून पिण्यासाठी टाकलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत संचालित 84 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली असून लाखो लिटर पाणी धो धो वाहून जात आहे. सदर पाईप लाईन लिकेज आहे? की फुटली आहे? याबाबत अधिकारीच ठामपणे सांगू शकतील.
परंतु सद्यास्थितीत पाइपलाइन गळतीची माहिती अधिकाऱ्यांना मी देत आहे. सदर पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी मागील अनुभव पाहता किमान दोन-तीन मागील अनुभव पाहता दिवसाचा कालावधी अपेक्षित असतो त्यामुळे 84 गावे आणि दोन-तीन शहरांचा पाणीपुरवठा दोन-तीन दिवसांसाठी प्रभावित होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी पर्याप्त पाणी साठा करून ठेवावा आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ पाईपलाईनच्या दुरुस्तीबाबत पाऊल उचलावी अशी मागणी होत आहे.