अकोला- मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेले शिलोडा, संजय नगर, सह पूर्ण भारत नगर परिसर जेव्हापासून अकोला मनपाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला तेंव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही या भागात चालण्यासाठी रस्ता नाही, पथदिवे नाहीत तसेच सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नाहीत नियमितपणे साफसफाई होत नाही त्यामुळे या परिसरातील रहिवाशी नागरिक नरक यातना भोगत आहेत पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे घांनचं असते लाईट नसल्याने नेहमी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते त्यामुळे रात्री अपरात्री कुणीही घराबाहेर निघण्याची हिम्मत करीत नाही.
अश्या स्थितीत कुणी आजारी पडले तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो अश्या परिस्थिती मधून सर्वसामान्य लोकांना चांगले आरोग्यासाठी त्यांना नरक यातने तुन बाहेर काढण्यासाठी आपण कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने ही जनता आपणाकडून या परिसरातील लोकांसाठी सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या ,चांगले रस्ते,पथदिवे तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करावे अशी मागणीसाठी आज जन लोकशाही संगठन ने आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन जन लोकशाही संगठन चे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासीर यांचे नेतृत्वाखाली मनपा आयुक्तां ना दिले आहे.
भारत नगर व परिसरातील नागरिक यांनी या मागण्यांसंदर्भात अनेकदा मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष केले गेले आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक नरक यातना भोगत आहेत त्यामुळे त्यांच्या या समस्येवर त्वरित तोडगा काढून त्यांना नरकापासून मुक्ती देण्यात यावी अन्यथा सगठण च्या वतीने आंदोलन करावे लागणार असून त्याची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासन ची असेल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी सैय्यद नासीर यांचे नेतृत्वाखाली , मोहम्मद इद्रीस , नासिर शाह , नाज़िम लीडर , रंजीत वाघ , बाबा भाई ,वसीम शेख , सद्दाम शाह , यांची प्रमुख उपस्थिती होती












