अकोला(प्रतिनिधी)- “खिडकी उघडली की पाऊस, आणि बातम्या लावल्या की राऊत” हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षात कुणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर हे नाव आहे संजय राऊत आणि त्यांच्यावरचेच मिम्स आता सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत.
सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून थेटपणे कुणी बोलत नाहीये, अपवाद आहे तो फक्त संजय राऊत यांचा… एकट्या भाजपला पुरुन उरतील अशाप्रकारे संजय राऊत यांनी बॅटिंग सध्या सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या एकामागून एक फैरी ते अशा झाडत आहेत, की भाजप हतबल झाल्याचं चित्र आहे.