अकोला(दिपक गवई)- अकोला राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उद्या दिनांक 3 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अकोला जिल्ह्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची माझ्यासमोर लाखनवाडा कापसी चिखलगाव या भागाची पाहणी करून दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत नुकसानभरपाई संदर्भात आढावा घेऊन तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत लवकरच यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारकडून पावले उचलली जाणार आहेत केंद्रीय राज्य मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात प्रथमच अकोल्यात मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पिक पाहणी करण्यासाठी येत आहे..दीपक गवई जनशक्ती अकोला.