तेल्हारा(प्रतिनिधी)-संपूर्ण महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे मोठ्याप्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उपास पाडीची वेळ आली आहे. अश्या परिस्थिती पीकविमा कंपन्यांकडून पुन्हा फार्म भरण्याचे उदासीन धोरण अवलंबण्यात येते आहे. पीक विमा कंपन्यांकडून पिकनुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक नुकसान सूचना फॉर्म भरणे बंधनकारक केले आहे. आज मा. पालक मंत्री डा. रणजीत पाटील साहेब दौर्यावर असतांना युवसेनेच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री साहेब यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या व्यथा मांडली.
अगोदरच पावसाने थैमान घातले असून खरीप पिकांचे नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे अश्या परिस्थितीत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांनी पीक नुकसान सूचना फॉर्म भरणे बंधनकारक केले आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची तारांबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी बाधवांची तेल्हारा येथील कृषि कार्यालय येथे गर्दी होत असून दिवस भर शेतकर्यांना तातकळत बसावे लागत आहे. त्याबरोबर अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्याना पैसे खर्च करून तेल्हारा येथील कृषि कार्यालय गाठावे लागत आहे त्याच बरोबर पीक विमा नुकसान सूचना भार्म भरण्याकरिता सुद्धा शेतकर्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. आज संतप्त शेतकरी बांधवांनी युवसेना पदाधिकार्यांना सह मा. पालक मंत्री डा.रणजीत पाटील साहेब यांचा ताफा अडवून आपल्या व्यथा मांडल्या यावेळी पालक मंत्री महोदयांनी त्वरित दखल संबधित अधिकार्यांना सूचना देऊन प्रत्येक गावात जाऊन स्वतः गटसचिवांनी शेतकर्यांचे पीक नुकसान भरपाई सूचना फॉर्म भरून घ्यावे असे निर्देश दिले.
त्याच बरोबर शेतकरी बांधवांना कुठलीही प्रकारची अडचण येता कामा नये अश्या सूचना अधिकार्यांना देण्यात पालक मंत्री साहेबांनी दिल्या. त्याच बरोबर तेल्हारा येथील कृषि कार्यालयामध्ये शासनाकडून देण्यात येत असलेल्या रब्बी पिका करिता हरभरा पिकाच्या जोकी आणि विजया या जातीच्या बिजवाई चे परमीट देण्यात येत नसल्याबाबत तक्रार सुद्धा सोडवण्यात याव्यात अशी मागणी शेतकर्यांनी केली पालक मंत्रीयांना यावेळी करण्यात आली आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख मुन्ना पाथ्रिकर ,जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे , शहर संघटक स्वप्नील सुरे,युवसेना सचिव सूरज देशमुख. उपसंघटक सूरज काईंगे, नीलेश धनभर,अमित घोडेस्वार, चेतन मलीये, गणेश रत्नपारखी शेकडो शेतकरी बाधव उपस्थित होते.
( *अतिवृष्टी मुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमणावर नुकसान झाले असून शेतकरी बांधव संकटात असतांना पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई सूचना फॉर्म भरणे बंधनकारक करणे शेतकर्यांची थट्टा करणे आहे त्वरित खरीप पीक नुकसान भरपाई शेतकार्याना देण्यात यावी अन्यथा युवसेना आक्रमक पवित्र घेऊन रस्त्यावर उतरणार आहे – सचिन थाटे युवसेना जिल्हा प्रवक्ता अकोला जिल्हा* )