तेल्हारा(विशाल नांदोकार)- शेतात काम करत असताना वीज कोसळून तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. या घटनांमध्ये अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
तेल्हारा तालुक्यातील वरुड येथील गणेश वामनराव मोकळकार, नागोराव गुलाबराव अढाऊ, गजानन गुलाबराव अढाऊ, मीना गोपाल नारे, वैष्णवी नागोराव अढाऊ व लक्ष्मी नागोराव अढाऊ हे पाच जण वरुड-भोकर शिवारातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजजाचे सुमारास अचानक वातावरण बदलले व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक शेतात वीज कोसळली. यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ हे या तीघांचा मृत्यू झाला. तर नागोराव अढाऊ व वैष्णवी अढाऊ हे गंभीर जखमी झाले.
तर जखमींमध्ये मीना गोपाल नारे वय ३२ वर्ष, वैष्णवी नागोराव अढाऊ वय १६ वर्ष व नागोराव गुलाबराव अढाऊ वय ४० वर्ष यांचा समावेश आहे.
दुसºया घटनेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.नेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.
१०८ रुग्णवाहिका असूनही जखमींच्या नातेवाईकांना घ्यावे लागले हेलपाटे
तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमींना आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ तापडिया यांनी तीन मजुरांना मृत घोषित केले आणि अन्य तीन मजुरांना अकोला येथे रेफर केले असता तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेला डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांना नेण्याकरिता जखमींच्या नातेवाईकांना खाजगी वाहनाने न्यावे लागले त्यामुळे १०८ रुग्णवाहिका नेमकी कान्त्या रुग्णांकरिता आहे हा सवाल उपस्थित होत आहे.