पातुर: (सुनिल गाडगे)- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. शेतकर्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन,मका,ज्वारी ह्या सारखी पिकांची सोंगणी करून ठेवली होती तर बहुसंख्य शेतकऱ्यांनी या पिकांची सूडी लावली होती परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पूर्णतः नासाडी केली असून शेतातील उभ्या पिकाला व जमा करून ठेवलेल्या पिकांना अंकुर फुटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झालेले असून निसर्गाने त्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.
शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पातुर तालुक्यात नवनिर्वाचित आमदार नितिन देशमुख हे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून पिकांची झालेली दयनीय अवस्थेची प्रत्यक्षात पाहणी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिली.
परतीच्या पावसाने आठ दिवसांपासून ठाण मांडल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांचं जणू दिवाळच काढल असून शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या संकटात नेऊन पोहोचवले.
शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या शेतात काबाडकष्ट करून शेतीची मशागत केली.परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे हाल केले.
सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे निसर्गाने समाधान कारक पाऊस दिला. परंतु ऐन पिकांच्या काढणीच्या वेळेस निसर्गाचा लहरीपणा मुळे शेतकऱ्यांचा घात झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावला.
शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार यांनी शपथ घेण्याच्या आधी शेतातील पिकांची पाहणी करण्यास प्राधान्य दिले. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची सूचना अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दिली.
शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करताना नवनिर्वाचित आमदार नितिन देशमुख यांच्यासोबत शिवसेेने चे रविन्द्र मूर्तडकर, राजू भगत,संजय वाडेकर, गजानन शिंदे,बालू वसतकर, संजय कासिद,शिवाजी लाहोळे,अजय ढोने, राहुल शेगोकार,व शिवशेनेचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नायब तहसीलदार,तालुका कृषि अधिकारी मंडळ अधिकारी,तलाठी,कोतवाल यांनी सुद्धा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुण सर्वे केला.आहे सदर पाहणी रविवारी दिवाळीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत केली आहे.