अकोट (सारंग कराळे):-आज अकोट शहरात ऐन दिवाळीच्या दिवशी क्षुल्लक वादावरून एका २२ वार्षीय युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरातील खानापूर वेस भागात सदर घटना घडली असून मृतकाचे नाव रोहित मोरे असे आहे.आरोपी व मृतकाचे क्षुल्लक कारणावरून वाद होऊन रागाच्या भरात आरोपीने अणकुचीदार वस्तूने रोहित मोरे वर हल्ला केला.यामध्ये रक्तस्त्राव जास्त झाल्याने उपचारा दरम्यान रोहीतची प्राणज्योत मालवली अखेर शहरात तनावग्रस्त परिस्थिती पाहता या भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी एका संशयित युवकाला तात्काळ ताब्यात घेन्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले व अकोट शहर पोलिस करीत आहेत.