तेल्हारा (प्रतिनिधी)- रस्त्यावरील चिखल उडाल्याने तेल्हारा आगारातील बस चालकास एका युवकाने बदडल्याने युवकाविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की तेल्हारा आगरची बस क्रमांक एम एच 30 वाय 5909 ही तेल्हारा येथुन शिर्डी येथे जात असताना शहरातील गायत्री नगरच्या पाण्याच्या टाकीजवळ बस जात असताना बाजूने जात असलेल्या युवकाच्या अंगावर बसच्या चाकामुळे चिखल उडाल्याने युवकाने बस चा पाठलाग करून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बस थाबवून बस चालकास शिवीगाळ करीत मारहाण केल्याने शेगाव नाका येथे काही काळ बघ्यांची गर्दी जमली होती यावेळी बस चालक लक्ष्मीनारायण राणे(34) यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली.आरोपी युवक गणेश बावस्कर (30) रा गायत्री नगर तेल्हारा विरुद्ध कलम 353,323,341,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करीत आहेत.
(विशेष म्हणजे तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची बिकट परिस्थिती असून शहरातून जाणाऱ्या रस्तावर चिखल मोठ्या प्रमाणात आहे अशातच तेल्हारा आगारातील काही बसचालक हे शहरातून आपली बस ही भरदाव चालवत असल्याने चिखल उडण्याचे प्रकार हे सर्रास तेल्हारा शहरात बघायला मिळतात त्यामुळे आजचा प्रकार सुद्धा असाच काही झाला असल्याचे बोलल्या जात असून आगार प्रमुखांनी चालकांना शहरातून बस योग्य पद्धतीने चालवण्याचे आदेश देण्याची गरज आहे.)
Dear editor you should not judge by your own way, how could you say that Agar need to advice Driver’s for their driving. Did you know what was the incident. Was you there while that incident happen. How can you judge someone without knowing everything.
If you see road condition of Telhara it is really pathetic it could happen by anyone that was not driver’s mistake. For your information rain and the pathetic road is the reason for that incident.
Bawskar n paise dele ka news che ?
Satya Paristhiti tr mahit nahi ani news takta. Rasta evdha kharab zala ahe, samorun evdhi bus yet ahe he distana apli chuk asun driver la marhan krne yogya ahe as aplya news varun diste