पातुर(सुनिल गाडगे ):-दृष्टी फाऊंडेशन व दत्त क्लिनीक,पातुर यांच्यातर्फे रविवारी (दि. 20/10/2019) रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पातुर येथील दत्त क्लिनीक गुरुवार पेठ येथे हे शिबिर होणार आहे. यावेळी उपस्थित रुग्णांवर कॉम्पुटर मशिनचे सहाय्याने उपचार केले जाणार आहेत.
आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी या दृष्टी फाऊंडेशन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरातील उपचार आयुर्वेदाच्या शल्क्य तंत्रावर आधारीत आहे. तसेच या शिबिरात उपचार करणारे डॉक्टर्स अधुनिक तंत्राच्या सहायाने उपचार करणार आहे. त्यात मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी त्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजाराच्या मुळाशी जाऊन त्यावर उपचार केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
संपर्कासाठी:-दत्त क्लिनीक , गुरुवार पेठ,पातुर