अकोट(सारंग कराळे)- अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे स्वाईन फ्लू सदृश तापी मूळे संगीता विनोद पाठक वय ५७ या महिलेचा आज ६ ऑक्टोबर रोजी खाजगी रुग्णालय अमरावती येथे अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे
येथिल प्रतिष्ठित नागरीक विनोद पाठक यांच्या पत्नीला ४ ऑक्टोबर रोजी साधारण ताप आल्यामुळे त्यांनी अकोट ला नेले व अकोट येथील डॉक्टरांनी त्यांना अकोला जाण्याचा सल्ला दिला मात्र ताप जास्त वाढल्याने त्यांनी नागपूर येथे जाण्यास सांगितले मात्र अमरावती जवळ तब्येत जास्त झाल्यामुळे त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले काही वेळ उपचार केल्यानंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी हा मृत्यू स्वाईन फ्लू सदृश तापामुळे झाल्याचे त्यांना सांगितले
त्यांच्या पच्छात पती,दोन मुले,सून,नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे
आरोग्य यंत्रणा कुचकामी
मुंडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र अनेक पदे रिक्त आहेत,कर्मचाऱ्यांची निवासस्थाने भग्नावस्थेत पडली आहेत त्यामुळे येथे काही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत,औषधांचा नेहमीच तुटवडा असतो