तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील वानधरणाच्या पाण्यासह भारत राखीव बटालियन कॅम्प बाबत आमदार प्रकाश भारसाकळे वारंवार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. आम्हाला स्थगिती नव्हे तर सदर शासन निर्णय रद्द पाहिजे ,स्थगिती मिळवू शकता तर शासन निर्णय रद्द का करू शकत नाही स्थगितीच्या नावा खाली आमदारानीं शेतकऱ्यांनच्या तोंडाला पाने पुसले असा घणाघाती आरोप करून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी बांधव सामूहिक निर्णय घेणार असल्याचा इशारा तेल्हारा येथे 26 सप्टेंबर ला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.
वारी हनुमान सागर धरणातील पाणी शासनाने अकोला करिता आरक्षित केले तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा हि शेतकऱ्यांची मुख्य मागणी असल्याने त्यावर स्थगिती नाही. तर रद्द आदेश पाहीजेत स्थगितीच्या नावाखाली आमदार प्रकाश भारसाकळे वारंवार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यासाठी तालुक्याच नव्हे तर संपूर्ण आकोट मतदार संघात अनेक आंदोलने झाली. वान धरण हे लाभधारक शेतकऱ्यांचे शेती सिंचन व्हावे या मुख्य उद्देशाने केले गेले. परंतु या धरणाचे पाणी विविध योजनेसाठी वापरले जात आहे तसेच शासनाने इतर पर्याय न शोधता सद्या अकोला करिता आरक्षित केले. यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिचनाचा प्रश्न निर्माण झाला तालुक्यातील बहुतांश गावत पाणी टंचाई आहे, असे असताना शासनाने अकोला करिता पाणी आरक्षित करण्याबाबत जो निर्णय घेतला तो रद्द व्हावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी सुरूवातीला शेकडो शेतकऱ्यांनची बैठक घेतली त्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवून शेकडो शेतकऱ्यांनच्या स्वाक्षरीचे जिल्हाधिकारी अकोला यांना सदर आरक्षण रद्द करण्याबाबत निवेदन दिले व शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली त्यानंतर अकोट विधानसभा मतदारसंघ कडकडीत बंद झाला व तेल्हारा शहरात तहसीलदार कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. त्यावर सुद्धा शासनाने कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यासाठी गावागावांत शेतकऱ्यांच्या मागणी वरून तालुक्यातील बहुतांश सरपंच यांनी शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला पाठींबा देऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व अनेक ग्रामपंचायत ने सदर शासन निर्णय रद्द करण्याबाबत ठराव घेतले त्या ठरावाच्या प्रतिचे निवेदन लवकरच जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांनि केलेल्या आवाहना नुसार तेल्हारा शहरासह गावोगावी आमदार भारसाकळे यांना गावबंदीचे बोर्ड लावण्यात आले होते.
कुठ तरी शेतकऱ्यांनचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचल्या जात असल्यामुळे पत्रकार परिषद घ्यावी लागली असे शेतकऱ्यांनी सांगितले तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथे होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प अकोला तालुक्यातील सिसा उदेगाव हिंगणा शिवारात पळविण्यात त्या नंतर वानचे पाणी सुध्दा पळविण्यात आले रस्त्याची दयनीय अवस्था झाली अशा प्रकारे मतदारसंघाची पार वाट लावण्यात आली पाणी व बटालियन कॅम्प पळवून जाऊ दयायचा व नंतर तूर्त स्थगिती आणायची अशी बनवाबनवी सुरू आहे. स्थगिती ही विशीस्ट कालावधी करिता असते निवडणूक झाली की उठविल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी मूर्ख बनवू नये, स्थगिती मिळवता येते तर शासन निर्णय रद्द का केले नाहीत हा आमचा प्रश्न आहे. वान मधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांनमुळे सिचन होऊ शकले नाही ,केवळ चार पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वान धरण सुध्दा सुरक्षित नाही ,कॅनालची दुरुस्ती नाही इतक्या वर्षांपासून कर्मचाऱ्यांनचे रिक्त पदे भरण्याकरिता आमदारांनी कधी प्रयत्न केले नाहीत. फक्त पाण्यासह बटालियन पळवून जाऊ दिले या साठी सुरू असलेले आंदोलन हे कुठल्याही राजकीय हेतूने नसून ही हक्काची लढाई आहे. शेतकऱ्यांनच्या काळजाचा तुकडा असलेली जमीन कॅनाल करिता फाडली परंतु भविष्याची स्वप्न पाहत असतानाच अचानकपणे दरोडा टाकून स्वप्न भंग केली. बटालियन मुळे तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळेल तेही स्वप्न भंगले एवढा मोठा अन्याय सहन करण्याची क्षमता आता राहिली नाही. त्यामुळे कधीही रस्त्यावर न उतरणारा शेतकरी शेतमजूर एवढ्या मोठ्या संख्येने एकवटून आंदोलनात उतरला आहे. सत्ताधाऱ्यानी याची दखल घेतली नाही ही खंत आहे.
आमदारांसह शासन कर्त्यांनी सदर शासन निर्णय रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांनच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे आकोट मतदार संघातील समस्त शेतकरी बांधव निवडणुकीत सामूहिक निर्णय घेणार व ते कुणाच्या पथ्या वर पडेल हे वेळेचं ठरवेल या साठी मोठे जनसंपर्क अभियान राबविण्यात येऊन जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. आमदारांच्या म्हणण्यानुसार २०ते २५गावांच्या बहिष्काराचा कुठलाही फरक पडत नाही, तो आता नक्कीच दिसेल असे सुध्दा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेला ,राम कडू,श्रीकृष्ण ठाकरे,श्रीराम ठाकरे,योगेश बिडवे, योगेश विचे, विष्णू मल्ल,गणेश कोरडे,हरिदास वाघ,मंगेश घोंगे, दीपक अहेरकर ,दिलशाद शाह, छोटू चितलांगे, सुनील नेमाडे,गणेश कडू,अमोल शेळके,लुकमान शाह, भास्कर आमले,शिवराज नेमाडे,वसंतराव बदरखे,जगन्नाथ दामधर, प्रशांत लोनाग्रे,चेतन वाघ, विनोद वसतकार, शिवाजी पिंजरकर, उमेश आंबूसकर ,चेतन इंगळे, गणेश अवचार ,प्रदीप अवचार ,विठ्ठल अवचार ,अशोक वानखडे,संतोष वानखडे, श्याम वानखडे, यांच्या सह तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने पत्रकार परिषदेला उपस्थित होते.