• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान करण्याचे नियोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
79 1
0
vidhansabha 2019
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक यंत्रणेने नियोजन केले असून हे नियोजन पूर्णत्वास जाऊन दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी १०० टक्के साध्य करण्यासाठी दिव्यांग संघटनांनी व समाजातील अन्य घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

विधानसभा निवडणूकीत नोंदणी झालेल्या सर्व दिव्यांग मतदारांचे मतदान होण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्रकाश अंधारे, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी प्रकाश अवचार, निरंजन इंगळे, नंदिती दामोदर, संजय बरेड तसेच ऑटो रिक्षा चालक व श्रमिक कामगार संघटनेचे संतोष शर्मातसेच दिव्यांग आर्ट गॅलरी, नॅशनल असो. फॉर दी ब्लाईंड, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, परिस संस्था, साथ फाऊंडेशन आदी संघटना व संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात सध्या १३ हजार ७०२ दिव्यांग मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्यात अकोला तालुक्यात ५४९९, अकोट तालुक्यात १९४९, तेल्हारा तालुक्यात १२२५, बाळापूर तालुक्यात १६६८, पातूर तालुक्यात ९६८, मुर्तिजापूर तालुक्यात १२१७ तर बार्शीटाकळी तालुक्यात ११७६ मतदार आहेत.

या निवडणूकीत ऑटोरिक्षा संघटना दिव्यांग मतदारांची ने आण करण्यासाठी मोफत १०० रिक्षा उपलब्ध करुन सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले. दिव्यांग संघटनांनी बुथ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिव्यांग मतदारांची नोंद घेऊन मतदार यादीत त्यांचे नाव निर्देशित करुन घ्यावे, जेणे करुन मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना संपर्क करुन त्यांना सेवा देणे शक्य होईल असे, जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. या शिवाय दिव्यांगांमध्ये मतदानाबाबत व मतदान करता यावे यासाठी करण्यात आलेल्या सोई सुविधांबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील ऑटो रिक्षा विविध सामाजिक संस्था, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि निवडणूक यंत्रणा सगळ्यांनी मिळून सर्व दिव्यांग मतदारांचे मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags: निवडणूकमहाराष्ट्र निवडणूकविधानसभाविधानसभा २०१९
Previous Post

शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रेत्यां विरुद्ध कारवाई करा

Next Post

आगामी दुर्गा उत्सवानिमित्त बाळापूर पोलीस स्टेशन येथे नवदुर्गा उत्सव मंडळांची बैठक संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नवदुर्गा उत्सव बाळापूर

आगामी दुर्गा उत्सवानिमित्त बाळापूर पोलीस स्टेशन येथे नवदुर्गा उत्सव मंडळांची बैठक संपन्न

प्रहार

अकोट मतदारसंघात प्रहार उतरणार रिंगणात, मोर्चेबांधणी सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.