पातुर (सुनील गाडगे)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७० वर्षापासून समाजहित व शैक्षणिक हिताचे काम करते आहेच. अ.भा.वि.प हे केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघटन आहे. हे आपण जाणताच अ.भा.वि.प च्या रचनात्मक व कार्यक्रियेशी आपण सुपरिचित आहातच. दि.24 सप्टेंबर2019 रोजी अ.भा.वि.प शाखा पातूर च्या वतीने छाञनेता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनामध्ये नूतन नगर कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली. या मध्ये नगर संयोजक अजय गाडगे तर नगरमंत्री म्हणून स्पनील इंगळे याची घोषणा करण्यात आली.
या छात्रनेता संमेलन साठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले. अ.भा.वि.प अकोलानगर संघटन मंत्रिं शक्तीजी केराम कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
तर छात्रनेता संमेलन ह्या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील 68विद्यार्थी कार्यकर्ता उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्रालढ्या मध्ये अनेक युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हि बाब लक्ष्यात घेता आजच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज आहे. आजचा विद्यार्थी हा केवळ अभ्यासापुरता मर्यादित राहून चालणार नाही तर त्यांच्या मध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे. या देशाला योग्य दिशा देण्यासाठी देशाला घडवण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी समोर आले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता देशभक्त असतो, आपण आपल्या देशाचाही विचार केला पाहिजेअसे प्रतिपादन शक्तीजी केराम यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य निमकंडे यांनी केले व सूत्रसंचालन अभिषेक देवर ह्यानी केले . ह्या कार्यक्रमाच्या वेळी अभिषेक देवर अकोला महानगर मंत्री ,अजिंक्य निमकंडे , सचिन बारोकार, गोपाल निमकंडे,महेंद्र फलके, सूरज क्षिरसागर, यांच्यासह यावेळी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते .
नवनिर्वाचित कार्यकारणी खालील प्रमाणे:-
पातूर नगर कार्यकारणी
नागरसंयोजक :- अजय गाडगे
नगर_मंत्री : स्वप्नील इंगळे
नगर सहमंत्री :- अनिकेत भाकरे
नगर सहमंत्री :-गणेश खरडे
महाविद्यालय प्रमुख :-आदित्य इंगळे
कार्यालय प्रमुख व कोष प्रमुख :-रोहित कुकळकर
प्रसिद्धी प्रमुख :- अक्षय गाडगे
विद्यार्थिनी प्रमुख :- सपना भराळी
विकासार्थ विद्यार्थी(S.F.D) :- रुपेश अवचार
(S.F.S) :- गणेश निमकंडे
स्वाध्याय मंडळ :- ऋषिकेश धांडे
कार्यकारणी सदस्य :- प्रशांत इंगळे
हिमांशू मालोसे
गोविंद निकाडे
तुषार मालसुरे
निखिल बारताशे
अजय सिरसाट