तेल्हारा (प्रतिनिधी)- महादेवराव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची तालुक्यातील कार्यकारणी शासकीय विश्राम गृह तेल्हारा येथे रासपचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी घोषित केली. यामध्ये तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी रवी गजानन चिंचोळकर तर शहरध्यक्ष पदी आशिष गणेशराव हागे या तडफदार तरुणांची सर्वानुमते निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हांडे यांनी नवायुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तशेच छत्रपती शिवाजी महाराज, व शाहू, फुले,आंबेडकर यांची विचारधारा व त्यांचे कार्य जनमानसांत पोहचवा व सदैव जनसामान्य जनतेच्या सेवेशी राहा असा संदेश दिला. यावेळी शेकडो युवक उपस्थित होते. रवी चिंचोळकर व आशिष हागे यांच्या नियुक्तीने तालुका व शहरातील युवकांनामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.